
अमळनेर:- तालुक्यातील कलाली येथे शॉर्ट सर्किटमुळे उसाला आग लावून शेतकऱ्याचे तब्बल साडे तीन लाखाचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे.
शेतकरी प्रकाश धनसिंग पाटील रा. कलाली यांचे १ हेक्टर ८२ आर क्षेत्र कलाली शिवारात शेती असून एका वर्षापूर्वी त्यांनी ठिबक सिंचनाद्वारे उसाची लागवड केली आहे. दि. ५ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता त्याच्या पुतण्या मुकुल याचा फोन आला की शेतात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे. त्यावेळी त्यांनी शेतात जावून पाहिले असता आग लागली होती. गावातील व्यक्तीने अग्निशामक बंब बोलवून शेतातील आग विझविली. सदर आगीत ठिबक नळ्या तसेच ऊस जळाल्याने शेतकऱ्याचे अंदाजे साडे तीन लाखाचे नुकसान झाले आहे. सदरची आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे शेतकऱ्याने नमूद केले आहे.




