अमळनेर:- तालुक्यातील कळंबु शिवारात रेल्वे पुलावरून जात असताना मालगाडीच्या धक्क्याने पुलाखाली पडुन महिलेचा मृत्यू झाला झाल्याची घटना घडली आहे.
पाडसे स्टेशन मास्तर रामदास पोहणे यांना लोको पायलट यांनी माहिती दिली की कळंबु शिवारात डाऊन लाईन km २३०/२६/२८ जवळ एक महिला ट्रकच्या जवळ पडलेली आहे. त्यावरून पाहणी केली असता सदर महिला नामे शोभा सुभाष अकलाडे वय ५२ (रा. इंधवे, साक्री) बेटावद स्थानकावरून उतरून बाम्हणे गावाकडे रेल्वेच्या पुलावरून जात असताना डाऊन लाईनवर मालगाडी आल्याने सदर महिलेला रेल्वेचा धक्का बसून पुलाखाली पडल्याने सदर महिलेचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मारवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो.ना भरत गायकवाड हे करीत आहेत.