अमळनेर:- खान्देश शिक्षण मंडळाची स्थगित झालेली निवडणूक घेण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्याने मतदान व मतमोजणीची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी यांनी कोविड नियमांचे पालन करून निवडणूक घेण्याची परवानगी दिल्याने अध्यक्ष अनिल कदम यांनी मतदान व मतमोजणीची तारीख जाहीर केली आहे. १३ फेब्रुवारी रोजी मतदान व १४ रोजी मतमोजणी होणार आहे. उमेदवारांना चार दिवसांचा वेळ मिळाला असून त्यात त्यांची धावपळ होणार आहे. मोठ्या प्रमाणावर अर्थपूर्ण घडामोडी ह्या चार दिवसात होणार असून मतदारांची चांदी होणार आहे.