
अमळनेर:- तालुक्यातील युवा कल्याण प्रतिष्ठान अमळनेर संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानाअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने खुली वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
सदर वकृत्व स्पर्धेसाठी अ गटामध्ये वय वर्ष ६ ते १६ आणि ब गटामध्ये वय वर्ष १६ व त्यापुढअसून दोन्ही गटांसाठी “स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज” हा विषय ठेवण्यात आला आहे. सदरच्या विषयावर प्रत्येक स्पर्धकाला तीन मिनिटांचा एक व्हिडिओ दिलेल्या टेलिग्राम लिंक वर https://t.me/+inzol22fp11hOWM1
पाठवायचा आहे. व्हिडीओच्या प्रारंभात स्वतःचे नाव , वय याचा उल्लेख करून स्पर्धेतील विषयाला सुरुवात करावी सोबतच स्पर्धकांनी आपले नाव नाव पत्ता मोबाईल क्रमांक आधार कार्ड अपलोड करून वरील लिंक वर पाठवायचा आहे.स्पर्धकांनी आपले विचार मराठी,हिंदी,इंग्रजी यापैकी एका भाषेत व्यक्त करायचे आहे.
स्पर्धेसाठी अ आणि ब गटांकरिता खालील प्रमाणे बक्षिसे दिली जाणार आहेत.प्रथम बक्षीस रोख रक्कम ₹ २५००/-व ट्राफी,द्वितीय बक्षीस रोख रक्कम,₹ १५००/-व ट्राफी,तृतीय बक्षीस रोख ₹ १००० व ट्राफी तसेच ५ उत्तेजनार्थ बक्षिसे प्रत्येकी रोख रक्कम ₹२००/- मात्र आणि ट्राफी यासह सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाईल. बक्षिस समारंभ १९ फेब्रुवारी २०२२ रोजी शिव जयंतीला असेल. सहभाग प्रवेश शुल्क प्रति स्पर्धकास नाममात्र ₹ २५/- मात्र असेल आणि हे शुल्क G Pay किंवा Phone Pe ने 9595954871 या क्रमांकावर पाठवून स्क्रीन शॉट घेऊन वरील टेलिग्राम लिंक वर पाठविणे बंधनकारक आहे. सदर स्पर्धेत शाळा, महाविद्यालयातून १० स्पर्धकांना सहभागासाठी प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षकांना ‘उपक्रमशील शिक्षक’ म्हणून सन्मानित केले जाईल तथा २५ स्पर्धकांना प्रोत्साहन देऊन स्पर्धेमध्ये सहभागी करून दिल्यास ‘उपक्रमशील मुख्याध्यापक प्राचार्य’ म्हणून सन्मानित केले जाईल.अधिक माहितीसाठी प्रा अशोक पवार 9422278256 यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.




