
अमळनेर:- युगप्रवर्तक छ.शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील पातोंडा विविध कार्यकारी सोसायटीमध्ये व छ.शिवाजी महाराज चौकात त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी मान्यवर संदीप रावसाहेब पवार, प्रवीण बापुसाहेब बिरारी, जयंतरावजी पवार, अशोकदादा पवार, भरतदेवजी बिरारी, सुनील चौधरी तसेच वि.का.सो. नवनिर्वाचित चेअरमन सुनील पवारासह सर्व संचालक मंडळ, तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते छ.शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. व त्यांना मानवंदना देण्यात आली. या प्रसंगी राहुल पवार, जगन्नाथ सोनवणे, अरुण पवार, नेहरु पवार, भरत पाटील, मधुकर चौधरी, संभाजी पाटील, किशोर पाटील, कैलास पाटील, राहुल लांबोळे, विनोद पवार, संजय पवार, सुनील चौधरी, मंगेश पवार तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ मान्यवरांची उपस्थिती होती.







