
अमळनेर खाजगी कोचिंग क्लासेस संघटनेतर्फे (पीटीए)
आयोजन…
अमळनेर– प्रोफेशनल टिचर्स असोसिएशन (PTA)
खाजगी कोचिंग क्लासेस संघटना, अमळनेर तर्फे
इ.10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी खास, परीक्षेला जाता जाता या कार्यक्रमाचे आयोजन रविवार,दि. 27 फेब्रुवारी रोजी शहरातील एम.जे.हॉल येथे करण्यात आले आहे.
सकाळी 9 वाजता हा कार्यक्रम होणार असून,सदर विशेष सत्रास उपस्थित राहून इ. 10 वी मार्च 2022 चा बोर्ड परीक्षेचा करंडक जिंका, असा दावा आयोजकांनी केला आहे. यावेळी प्रमुख पाहुणे व उद्घघाटक म्हणून प्रांताधिकारी सीमा अहिरे मॅडम तसेच गट शिक्षणाधिकारी मा.एस.पी. चव्हाण मॅडम, अमळनेर ह्या राहणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून एस.डी.देशमुख सर, अमळनेर (विषय-बोर्ड अनुभव कथन), जयदिप पाटील सर, जळगाव (विषय-विज्ञान), रविंद्र लष्करे सर, अमळनेर (विषय-गणित), गौरव महाले सर, चोपडा (विषय-परीक्षेला जाता जाता) हे असून व्याख्यानात बोर्डाची उत्तरपत्रिका कशी लिहावी?, परीक्षेतील तीन तासांचे व्यवस्थापन, परीक्षा हॉलमधील आत्मविश्वास, परीक्षा काळातील घरातील वातावरण, पेपर लिहिण्याचे तंत्र, परीक्षा काळातील उजळणी,परीक्षेची भिती घालवणे, मेरीट लिस्टमध्ये येण्यासाठीच्या टिप्स, विषयानुरूप लिहिण्याची पद्धत, पेपर प्रेझेंटेशन, विधायक विचार इत्यादी विद्यार्थ्यांनी सोबत वही व पेन आणावेत.विद्यार्थ्यांनी या मोफत कार्यक्रमाचा लाभ घ्यावा,असे आवाहन महाराष्ट्र खाजगी कोचिंग क्लास संघटनेचे(PTA)राज्य समन्वयक-भैय्यासाहेब मगर सर, विनोद जाधव सर व सर्व सदस्य खाजगी कोचिंग क्लासेस संघटना (PTA) अमळनेर यांनी केले आहे.




