अमळनेर:- तालुक्यातील शेतकऱ्याच्या थकीत अनुदान व प्रश्नांबाबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले.
अमळनेर तालुक्यातील सप्टेंबर 2019 मधील अतिवृष्टी बाधित 32 गावांचे अनुदान बाकी असून तसेच २०२१ मधील खरीप हंगामात आठही महसूल मंडळांत अतिवृष्टी व अवकाळी पावसाने केलेल्या नुकसानीची भरपाई बाबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना शिर्डी येथे निवेदन देण्यात आले. यावेळी सुरेश पिरण पाटील, गोकुळ नामदेव पाटील, धनगर दला पाटील, सुभाष सुकलाल पाटील, मनोज दाजीबा पाटील, बी.के. सुर्यवंशी, के. डी.पाटील, महेश पाटील, अजहर, मयुर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.