
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील कै.नानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.वसंत श्रावण देसले हे होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला वि.वा.शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्राजक्ता निकम हिने केले प्रा. डाॅ.संजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डॉ.पवन पाटील उपस्थित होते.यावेळी मनोगतात मराठी भाषेचे महत्व आणि वि.वा. शिरवाडकर यांच्या विषयी सखोल अशी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. आभार कु.किरण गणेश साळुंखे हिने मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. यावेळी प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.







