अमळनेर:- तालुक्यातील मारवड परिसरातील विट भट्टीवर मूळच्या छत्तीसगड येथील विट भट्टी कामगाराने विष प्राशन केले होते. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
नरेश महारु चव्हाण (वय २६) असे मयताचे नाव असून तो मूळचा राहणार मेहंदी ता. पामगड जि. जांजगिरचापा (छत्तीसगड) येथील असून दिनांक २० फेब्रुवारी रोजी त्याने दारूच्या नशेत विषारी औषध प्राशन केले होते. त्याला अमळनेर ग्रामीण रुग्णालयात व त्यानंतर हिरे मेडिकल कॉलेज धुळे येथे उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असून अकस्मात मृत्यूची नोंद मारवड पोलिसात करण्यात आली आहे. पुढील तपास पो ना सुनील तेली हे करीत आहेत.