अमळनेर:- तालुक्यातील साने गुरुजी उपसा सिंचन योजनेच्या संचालकपदी बोहरा येथील प्रगतीशील शेतकरी , ज्येष्ठ सामाजिक राजकीय कार्यकर्ते आसाराम सोमा धनगर यांची एन. टी. या प्रवर्गातून २०२२ ते २०२७ या पाच वर्षासाठी सतत दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. सदरची योजना ही तालुक्यातील बोहरा , मारवड , कळमसरे , पाडळसरे , गोवर्धन या गावांसाठी आहे. सध्या ही योजना बंद अवस्थेत असून तिच्या पुनर्जीवनासाठी प्रयत्न सुरू आहेत. आसाराम बापू धनगर हे तालुक्यातील सुपरिचित असे सेवाभावी कार्यकर्ते असून बोहरा वि. का सोसायटीचे विद्यमान संचालक व बोहरे दूध उत्पादक संघाचे ( दूध डेअरी ) चेअरमन म्हणूनही त्यांनी पद भूषविले होते . भुसावळ येथील माध्यमिक शिक्षक वसंत रत्नपारखी , पारोळा येथील प्राध्यापक मनोज रत्नपारखी, व प्रगतीशील शेतकरी विजय रत्नपारखी यांचे ते वडील आहेत. आसाराम बापू धनगर यांच्या सुयोग्य नियुक्तीचे पंचक्रोशीत स्वागत व अभिनंदन होत आहे.