
शरद पवारांच्या निवासस्थानावरील हल्ल्याचा निषेध…
अमळनेर:- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानावर एसटीच्या कर्मचार्यांनी हल्ला चढवला. या प्रकरणाचे शहरात तीव्र पडसाद उमटले. एखाद्या प्रश्नावर नेत्यांच्या निवासस्थानी हल्ला करणे ही पुरोगामी महाराष्ट्राची संस्कृती नाही. यामुळे प्रकरणाची सखोल चौकशी करून यामागील सूत्रधारांचा शोध घ्यावा, दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पदाधिकार्यांनी केली आहे. हल्ल्याच्या घटनेचा निषेधार्ह रास्तारोकोही करण्यात आला.
शरद पवारंच्या पाठीशी संपूर्ण ताकदीने पक्ष उभा आहे आणि जे कोणी अशी कृत्य करतील त्याना त्यांची जागा दाखवल्या शिवाय आम्ही शांत बसणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. बस स्थानक परिसरात रास्तारोको करत टायरही जाळण्यात आले. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस दलाने खबरदारी घेतली. आंदोलनात जि.प.सदस्य जयश्री पाटील, कृ.उ.बा.समिती प्रशासक तिलोत्तमा पाटील, ग्रंथालय विभागाच्या प्रदेश सचिव रिता बाविस्कर, तालुकाध्यक्ष सचिन पाटील, शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, कार्याध्यक्ष विनोद कदम, शेतकीसंघ प्रशासक संजय पाटील, पं.स. सदस्य निवृत्ती बागुल, रणजीत पाटील, इम्रान खाटीक, गोविंदा बाविस्कर, निनाद शिसोदे, भूषण भदाणे, राहुल गोत्राळ, सनी गायकवाड, सुनिल शिंपी, उमेश सोनार, कृष्णा बोरसे, बाळू पाटील व प्रमुख पदाधिकारी, प्रशासक सदस्य, सरपंच, उपसरपंच आजीमाजी सर्व फ्रंटलचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







