अमळनेर :- केंद्रीय एन मुक्टोच्या आदेशाने प्रताप कॉलेजच्या स्थानिक शाखेतर्फे पूज्य साने गुरुजी सभागृहात वार्षिक सर्व साधारण सभा घेण्यात आली. या प्रस्तुत सभेत जाने 2022 ते डिसेंबर 2023 या कालखंडातील नव नियुक्त कार्यकारीणी सर्वानुमते ठरविण्यात आली. अध्यक्ष प्रा.पराग पाटील, उपाध्यक्ष डॉ.हर्षवर्धन जाधव, सचिव डॉ.एस. बी. नेरकर, जिल्हा प्रतिनिधी डॉ.विजय तुंटे, कोषाध्यक्ष प्रा.किरण सुर्यवंशी अंतर्गत हिशोब तपासणीस डॉ.तोरवणे, सह सचिव प्रा. एस. डी. बागुल महिला प्रतिनिधी म्हणून डॉ.नलिनी पाटील व प्रा.वैशाली राठोड, केंद्रीय प्रतिनिधी डॉ.ए.बी.पाटील, सेवानिवृत्त प्रतिनिधी डॉ. पी. बी.भराटे अशी कार्यकारणी असून या निवडी बद्दल संस्थेचे चिटणीस डॉ.ए.बी.जैन,प्राचार्य डॉ.पी.आर.शिरोडे,उप-प्राचार्य डॉ.एम एस वाघ, डॉ.पटवर्धन, डॉ.निकुंभ, डॉ.कल्पना पाटील, डॉ. जे. आर. गुजराती, प्रा.सुधिर पाटील, प्रा.जे.सी.अग्रवाल या सर्वांनी कार्यकारीणीचे अभिनंदन केले आहे. या वेळी निवडणूक अधिकारी म्हणून प्रा.जे.बी.जैन यांनी काम पाहिले.