अज्ञात चोरट्याविरुद्ध मारवड पोलिसांत गुन्हा दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील करणखेडा येथून डीजेच्या गाडीतून २,६६ लाखाचे साहित्य अज्ञात चोरट्याने लंपास केले असून मारवड पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
फिर्यादी गणेश शांताराम गुरव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते ११ एप्रिल रोजी वणी गडावर दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांची डिजे ची गाडी अंबारे रोडवरील ग्रामपंचायती जवळील खळ्यात लावली होती. दिनांक १४ रोजी परत आल्यावर डिजेची गाडी पाहायला गेले असता त्यावरील साहित्य लंपास झाल्याचे दिसून आले. त्यात वाजंत्रीचे विविध साहित्य, AMP ४.० चे तीन पिस, मिक्सर, माईक यासह २ लाख ६६ हजार ७०० रुपये किमतीचे साहित्य चोरीस गेल्याचे लक्षात आल्याने मारवड पोलीसात तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेकॉ बाळकृष्ण शिंदे हे करीत आहेत.