
रविवारी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेतर्फे महाप्रसादाचे आयोजन…
अमळनेर:- येथील तहसील कार्यालयाच्या आवारात रविवार दि. १७ रोजी श्री गुरुदत्ताच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे.
दिनांक १७ एप्रिल रविवार रोजी अमळनेर तालुका सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानदार संघटनेतर्फे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी श्री गुरुदत्ताच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा व महापूजा होणार असून महापुजेची वेळ दुपारी ११ ते ३ अशी असणार आहे. तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून संध्याकाळी पाच वाजेपासून महाप्रसादास सुरुवात होणार आहे. सर्व भाविकांनी यावेळी उपस्थिती द्यावी असे आवाहन तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेतर्फे करण्यात आले आहे.




