केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरींनी दिली आमदारांना माहिती…
अमळनेर:- येथील चोपडा रस्त्यावरील रेल्वे उड्डाण पुलाचे काम पूर्णत्वास येऊन हा पूल लोकार्पणाच्या प्रतीक्षेत असताना लवकरच या उड्डाणपुलाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरींच्या हस्ते व्हर्चुअल पद्धतीने होणार असल्याची माहिती आ.अनिल पाटील यांनी दिली आहे.
याबाबत आ.अनिल पाटील हे नुकतेच दिल्ली दौऱ्यावर असताना आ.अनिल पाटील यांनी पाडळसरे धरणाच्या निमित्ताने ना.गडकरी यांची भेट घेतली होती,त्यावेळी त्यांनी अमळनेर येथील नवीन रेल्वे उड्डाण पुलाचे काम पूर्णत्वास आल्याने या पुलाचे लोकार्पण करण्यासाठी तारीख मिळावी अशी विनंती आ.अनिल पाटील यांनी केली होती,तसेच माजी मुख्यमंत्री तथा खा.अशोकराव चव्हाण यांनी देखील आ.अनिल पाटील यांच्या वतीने उड्डाण पुलाचे लवकर लोकार्पण करावे अशी विनंती ना.गडकरी यांना केली होती,त्यामुळे ना गडकरी यांनी लवकरच तारीख कळविली जाईल असे आश्वासन आमदारांना दिले होतें.दरम्यान ना.गडकरी यांच्या जळगाव जिल्ह्या दौऱ्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून ते जळगाव येथून विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण व्हर्च्युअल पद्धतीने करणार आहेत. त्यात अमळनेर येथील उड्डाणपूलाचे लोकार्पण देखील समाविष्ट केले असल्याची माहिती आ.अनिल पाटील यांना केंद्रीय स्तरावरून कळविण्यात आली आहे.येत्या एक दोन दिवसात अधिकृत तारीख आपल्याला प्राप्त होणार असल्याची माहिती आ.अनिल पाटील यांनी दिली आहे.