अमळनेर:- तालुक्यातील एकलहरे येथे पंख्याचे बटन सुरू करायला गेलेल्या महिलेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एकलहरे येथील कैलास जगन्नाथ माळी हे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत असतात. दिनांक १० रोजी सकाळी ६:३० वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी कल्पनाबाई कैलास माळी ह्या ओल्या केस सुकवण्यासाठी इलेक्ट्रिक पंख्याचे बटन सुरू करण्यास गेल्या असता त्यांना शॉक लागून बेशुद्ध झाल्या. त्यांना नरडाणा प्रा. आरोग्य केंद्रात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यावरून मारवड पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो सचिन निकम हे करीत आहेत.