युवकांसह राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व युवक काँग्रेसचा सहभाग…
अमळनेर:- केंद्र शासनाच्या “अग्निपथ प्रवेश योजना” विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व युवक काँग्रेसच्या माध्यमातून भव्य मोर्चा शहरातील तिरंगा चौक पासून महाराणा प्रताप चौक, तहसील कार्यालय पर्यंत काढण्यात आला.
या दरम्यान अमळनेर तालुक्यातील सर्व सैन्य व अर्धसैनिक बलासाठी प्रयत्न करत असणाऱ्या विद्यार्थी व युवकांनी मोठ्या संख्येने यात सहभाग घेतला होता. या वेळी जमलेल्या विद्यार्थ्यांनी केंद्रशासनाच्या विरोधात घोषणा देत आपला निषेध नोंदविला. केंद्र शासनाने या योजनेमध्ये योग्य बदल नाही केला तर येणाऱ्या दिवसात तालुक्यातील विद्यार्थी व युवक जळगाव जिल्ह्याचे खासदार यांच्या कार्यालयावर हा मोर्चा काढणार असल्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष सनी गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. या वेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे, तालुकाध्यक्ष अनिरुद्ध शिसोदे, शहराध्यक्ष सनी गायकवाड, युवक कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष महेश पाटील, कार्याध्यक्ष कुणाल चौधरी, शहराध्यक्ष तौसिफ तेली, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे दुर्गेश साळुंखे, कृष्णा बोरसे, तेजस पाटील,उज्वल निकम,आकाश सैदाने, शुभम सुर्यवंशी, आदित्य संदाशिव, दर्शन पाटील,गौरव राजपूत, वैभव राजपूत, यश राजपूत, वेदांत पाटील,ऋषी बोरसे, बाबाजी पाटील, हिमांशू पाटील, दिग्विजय निकम, समीर शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.