अमळनेर:- जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अमळनेर या शाळेचे दहावीच्या परीक्षेस एकूण ५० विद्यार्थी प्रविष्ठ झालेले होते. या शाळेचा निकाल ९६.४०% लागला असून या शाळेतून घनश्याम प्रदीप ठाकरे ९०% प्रथम तर मोक्ष तुषार देवरे ८९.४०% द्वितीय तर प्रभूराज शांताराम पाटील ८८.४०% तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे धनदाई माता एज्यु. सोसायटीचे अध्यक्ष नानासाहेब डी.डी.पाटील, सचिव राधेश्याम पांडुरंग पाटील, उपाध्यक्ष बापूसो.के.डी पाटील संचालक शैलेंद्र पाटील व सर्व सन्माननीय संचालक मंडळ व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.