सागर मोरे
पातोंडा ता.अमळनेर:- येथून जवळ असलेल्या सावखेडा येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची सन 2022 ते 2027 ह्या वर्षाची तेरा जागांसाठी पंचवार्षिक निवडणूक नुकतीच संपन्न झाली. विजयी झालेल्या सभासदांमधून चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक लागली होती. सदर निवडणूक विकासोच्या सदस्यांच्या सहकार्याने बिनविरोध करण्यात आली.त्यात चेअरमन पदी सुभाष कदम तर व्हाईस चेअरमनपदी प्रदिप जैस्वाल यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सावखेडा व धावडे गावांची एकत्रीत विविध कार्यकारी सोसायटी असून सन 2022 ते 2027 च्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी एकूण 18 उमेदवारांनी नामनिर्देशन दाखल केले होते. त्यापैकी गुलाब कदम, डि.एस पाटील(धावडे), सुधाकर कदम, किशोर कदम, नारायण मिस्तरी व अपृकबाई कदम यांनी माघार घेत विकासोची निवडणूक बिनविरोध करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. सुभाष कदम, प्रदिप जैस्वाल जिजाबराव महाले, विलास कदम, सुरेश कदम, दत्तात्रय कदम, जिजाबराव सोनवणे, दिनेश कदम, रत्नाकर महाले, कलाबाई कदम, शोभाबाई सोनवणे, विलास अहिरे व गोवा वैदू ह्या उमेदवारांची संचालक पदी बिनविरोध निवड झाली होती. दि.08 रोजी चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक लागली होती. नारायण सुतार यांच्या माघारीने व त्यात सर्वच नवनिर्वाचित संचालकांनी केलेल्या एकमताने सुभाष कदम यांची चेअरमन पदी तर प्रदिप जैस्वाल यांची व्हा.चेअरमन पदी बिनविरोध निवड केली. सावखेडा विकासोच्या इतिहासात प्रथमच बिनविरोध निवडणूकीचा एक नविन पायंडा सुरू केल्याने सर्व सदस्य व संचालक मंडळावर ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे. निवडणूक बिनविरोध होणेकामी व्हि. सी. पाटील, गुलाबराव कदम, दिपक कदम, दिनेश कदम, श्याम कदम, व भुपेश सोनवणे यांचे अनमोल सहकार्य लाभले. आर. यु. पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले तर सचिव नितीन पाटील यांनी निवडणूक प्रक्रीयेत सहकार्य केले.