अमळनेर:- तालुक्यातील डांगरी परिसरात छापा टाकत मारवड पोलिसांनी चार गावठी दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, डांगरी परिसरात व माळन नदीकाठी अनेक जण गावठी दारू तयार करून विक्री करत असल्याची माहिती मिळाल्याने मारवड पोलिसांच्या पथकाने छापा टाकला असता रमेश बंडू वडर व शांताराम दोधू भील हे आपापल्या घराच्या आडोश्याला गावठी दारू सह आढळून आले. तसेच रातिलाल साहेबराव भोई व विलास धर्मा कोळी हे मालन नदीकाठी मुद्देमालासह आढळून आले. त्यांच्याकडे एकूण १७,१०० रुपयांचा एकूण मुद्देमाल आढळून आला. नमुने घेवून उरलेल्या साहित्याचा जागीच नाश करण्यात आला. यावेळी चारही आरोपींविरुद्ध मु. प्रो. अँक्ट ६५ (ई) अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.ना. मुकेश साळुंखे हे करीत आहेत.