
अमळनेर:- येथील पोलिस स्टेशन हद्दीत रॅपिड ऍक्शन फोर्स व पोलिसांचा काल रूट मार्च काढण्यात आला.
अमळनेर पोलीस स्टेशनचे अधिकारी व पोलिस अंमलदार तसेच होमगार्ड यांचा माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव तसेच पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली संवेदनशील भागातून तसेच संमिश्र वस्तीतून पोलीस रूट मार्च घेण्यात आला. सदरील रूट मार्च हा पाच पावली देवी पासून पवन चौक, झामी चौक, बादरपुर नाका, भोईवाडा, माळीवाडा, कसाली मोहल्ला, संत सखाराम वाडी संस्थान, पान खिडकी, सराफ बाजार, दगडी दरवाजा, शहरातील मुख्य बाजारपेठ, झाशी राणी चौक गांधीपुरातील संमिश्र वस्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात अशा ठिकाणी रूट मार्च घेण्यात आला. यात अमळनेर पोलीस स्टेशनचे 8 अधिकारी, 64 पोलीस अमलदार, 38 होमगार्ड, 1 आरसीपी, 1 पोलीस मुख्यालय कडील स्टकिंग फोर्स, रॅपिड ऍक्शन फोर्सचे 1 मेजर, 12 अधिकारी व 87 कर्मचारी आदींचा सहभाग या रूट मार्च मध्ये होता.







