जागेवरच शवविच्छेदनानंतर अग्निडाग देत केले अंत्यसंस्कार…
अमळनेर:- तालुक्यातील सावखेडा येथील बसस्टँडपासुन एक कि.मी च्या हाकेच्या अंतरावर अमळनेर रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेने मृग हरण मृत झाल्याची घटना काल ५ रोजी घडली आहे.
सावखेडा बस स्थानकापासून एक किलोमीटर अंतरावर अज्ञात वाहनाच्या धडकेने हरणाचा मृत्यू झाल्याचे आढळून आल्याने भानुदास पाटील यांनी दुपारी साडेअकरा वाजेच्या दरम्यान पारोळा वनपरिक्षेत्र अधिकारी श्याम देसले यांना यांनी दूरध्वनी द्वारे माहिती दिली. पारोळा वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी शाम देसले वनरक्षक सुप्रिया देवरे, कर्मचारी ज्ञानेश्वर पाटील व अधिकार पारधी यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पातोंडा येथील पशुधन अधिकारी डॉ. रविंद्र गाडे डॉ. सतीष भदाणे यांनी वन विभाग पथकासमोर जागेवरच मृत हरणाचे शवविच्छेदन केले व लगेच अग्निडाग देऊन त्यांच्यावर पंचा समक्ष अंत्यसंस्कार करण्यांत आले. यावेळी पोलिस पाटील भरत निकुंभ, विजय पाटील, भानुदास पाटील, रतन वैदू, दुर्गादास वैदु, दिलीप महाराज आदींनी सहकार्य केले.