विप्रो व आधार संस्थेच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांची मोफत डोळे तपासणी…
अमळनेर:- गरिबीमुळे डोळे तपासता येत नाहीत आणि परिणामी शैक्षणिक नुकसान होणाऱ्या मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी विप्रो आणि आधार संस्थेच्या वतीने तालुक्यात मंगरूळ येथील स्व अनिल अंबर पाटील माध्यमिक शाळेत मोफत चष्मे वाटप करण्यात आलेत.
कोरोना काळात मुले सातत्याने मोबाईल ,टी व्ही, कॉम्प्युटर डिजिटल स्क्रीन समोर असल्याने मुलांमध्ये दृष्टिदोष आढळला होता. मात्र ग्रामीण भागात गरीब शेतकरी ,मजूर वर्ग यामुळे मुलांची डोळे तपासणी किंवा शस्रक्रिया करण्यास टाळाटाळ केली जात होती. त्याचा मुलांच्या वाचनावर व फळ्याकडे निरीक्षण करण्यावर परिणाम झाला. मुलांमध्ये शैक्षणिक रस कमी झाल्याने विप्रो व आधार बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मुलांची मोफत डोळे तपासणी करून काहींच्या शस्रक्रिया तर काहींना चष्मे मोफत वाटण्यात आले. यावेळी विप्रोचे एच आर मॅनेजर सुधीर बडगुजर, अकाउंट मॅनेजर आनंद निकम, प्रोडक्शन मॅनेजर सजल सक्सेना, आधार संस्थेच्या भारती पाटील, निकिता पाटील, मयूर गायकवाड, मुख्याध्यापक प्रकाश पाटील, अशोक सूर्यवंशी, प्रभूदास पाटील, संजय पाटील, राजेंद्र पाटील, सुषमा सोनवणे , शीतल चव्हाण, सीमा मोरे, प्रवीण पाटील, मनोज पाटील, सुदर्शन पवार, खुशाल पाटील आदी हजर होते.