शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना व धनराज फांऊडेशनतर्फे गौरव…
अमळनेर:- ग्राम विकास शिक्षण संस्था मुडी संचलित कै.हि.पो. पाटील माध्य.विद्यालय अंबाप्रिप्रीचे कर्तव्यदक्ष लिपीक संजय पाटील यांना उल्लेखनिय कार्याबद्दल जीवन गौरव पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले.
जळगाव जिल्हा खाजगी शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना व धनराज विसपुते फांऊडेशन तर्फ मंगळ ग्रह मंदीर येथे अजय देशमुख यांच्या हस्ते दि.९ ऑक्टोबर रोजी हा पुरस्कार देण्यात आला. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मिलिंद जोशी होते. त्या प्रंसगी माध्प.पतपेढीचे अध्यक्ष एस.डी. भिरुड, संभाजी अप्पा पाटील, ग.स.पतपेढीचे अध्यक्ष उदय बापु पाटील प्राथ. शिक्षणाधिकारी विकास पाटील मंगेश भोइटे अमळनेचे गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील, तुषार बोरहे, बापु चव्हाण आर.ए.शिंदे, योगेश भोइटे, विनोद माहेश्वरी आदी हजर होते. संजय पाटील यांना जीवन गौरव पुरस्कार मिळाल्या बद्दल संस्थेचे कायम संचालक रमेश विनायकराव पाटील,प्रभारी अध्यक्ष पंजाबराव नाना सुर्यवंशी, सचीव सुनिल पाटील व सर्व कार्यकारणीचे पदाधिकारी तसेचे संस्थेतील सर्व मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.