
डिसेंबरमध्ये उडणार निवडणुकांचा बार, निवडणूक कार्यक्रम जाहीर…
अमळनेर:- राज्यभरातील अनेक ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने त्याबाबत निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे.
अमळनेर तालुक्यातील २४ ग्रामपंचायतीची मुदत संपली असून ऐन हिवाळ्यात गावागावात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.

यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दिनांक २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर पर्यंत,
उमेदवारी अर्ज छाननी दिनांक ५ डिसेंबर,
उमेदवारी अर्ज माघार घेणे व चिन्ह वाटप – दिनांक ७ डिसेंबर,
मतदान दिनांक – रविवार १८ डिसेंबर,
मतमोजणी दिनांक – २० डिसेंबर रोजी होणार आहे.
तालुक्यातील पुढील ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत.
तासखेडे, आमोदे, रंजाणे, नगांव बु., नगांव खु., सुंदरपट्टी, हेडावे, कामतवाडी, निमझरी, रुंधाटी, मुंगसे, गंगापूरी, भिलाली, बाम्हणे, जैतपिर, खापरखेडा, मारवड, वावडे, कन्हेरे, इंद्रापिंप्री, जानवे, चोपडाई, कोंढावळ, डांगर बु.
या निवडणुकीत सरपंच पदाची निवड जनतेतून होणार असून सुमारे 24 ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर झाल्या असल्याने संबंधित गावांमधील उमेदवारांची लगबग वाढली आहे.