चोपडा रस्त्यावरील पुलाजवळील प्रकार, अमळनेर पोलिसांची धडक कारवाई…
अमळनेर:- येथील चोपडा रस्त्यावरील पुलाजवळ प्रवाश्यांना अडवून लोखंडी रॉडचा धाक दाखवत लूट करणारी टोळी अमळनेर पोलिसांनी कारवाई करत जेरबंद केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ५ नोव्हेंबर रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास चोपडा रस्त्यावरील नवीन पुलाच्या पुढे एकूण सहा इसम हातात लोखंडी रॉड घेवून तसेच रस्त्यावर दगड आडवे लावत रस्ता लुटीसाठी जमून एक टँकर चालकास मारहाण करत जबरीने लुटल्याने अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. तसेच यापुर्वी देखील नमुद ठिकाणी असे लुटमारीचे किरकोळ प्रकार झालेले होते परंतु कोणीही तक्रार देण्यास पुढे आलेले नाहीत. तसेच वर दाखल गुन्ह्यांतील अज्ञात इसमांचा ओळख पटविण्याकरीता पुरेसा पुरावा उपलब्ध नव्हता. त्यामुळे या गुन्ह्यांचा तपास सुरु असतांना पो.नि. जयपाल हिरे यांनी तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी, पोना मिलींद भामरे, पोना सुर्यकांत साळुंखे, पोकाँ राहुल पाटील, पोकाँ राजेंद्र देशमाने अश्यांना अश्याप्रकारच्या गुन्हे करणारे कार्यपध्दती असलेल्या गुन्हेगांराची माहीती संकलित करुन त्यांच्या कडुन गुन्हा उघडकीस आणणेकामी प्रयत्न करणेबाबत सुचना दिल्या होत्या. त्यादृष्टीने गुन्ह्यांचा तपास चालू असतांना अमळनेर पो.स्टे. रेकॉर्डवरील गुन्हेगार यांच्याकडे गुन्ह्यांच्या अनुषंगाने तपास सुरु असतांना त्यातील एकाने प्रथम उडवा उडवीचे उत्तरे देवुन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करु लागल्याने त्यावरुन पथकाचा त्याच्या वरील संशय बळावल्याने त्यास ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला आणले. त्यास पो. नि. जयपाल हिरे यांनी विश्वासात घेवुन विचारपुस करता त्यांने त्याचे साथीदारांसह वरील गुन्हा केल्याची कबुली देत त्यातील दोघांची नाव पत्ते सांगितले आहेत त्यावरुन आता पर्यंत तीन आरोपीना अटक करण्यात आली आहे. सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असुन आरोपींची फिर्यादी कडुन ओळख परेड बाकी असल्याने त्यांचे नावे उघड करण्यात आली नाहीत. सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उप विभागीय पोलीस अधिकारी कृषिकेश रावले यांच्या सुचनेप्रमाणे व पो. नि. जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाने सहा. पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी, पोना मिलींद भामरे, पोना सुर्यकांत साळुंखे, पोकाँ राहुल पाटील, पोकाँ राजेंद्र देशमाने यांनी बजावली आहे. यावेळी अमळनेर पोलीसांकडुन चोपडा रोड रेल्वे पुलाजवळ कोणासोबत अशा प्रकारची घटना घडुन लुट झाली असल्यास पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.