अमळनेर येथे मंत्री गिरीश महाजन यांना शिक्षकांनी दिले निवेदन…
अमळनेर:- मुंबई येथील आझाद मैदान येथे आंदोलनास बसलेल्या तमाम अंशतः 20% 40% घोषित शिक्षक बांधवांना न्याय देण्याची मागणी करत मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र राज्यातील तमाम अंशतः अनुदानित आणि विनाअनुदानित बांधवांना त्यांच्या हक्काचा शंभर टक्के पगार मिळावा म्हणून वेळोवेळी आंदोलन करून देखील अद्याप अनुदानाचा प्रश्न सुटलेला नाही. गेल्या 10 ऑक्टोबर पासून आझाद मैदान येथे 100% अनुदान मिळण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे. यशाचा एक भाग म्हणून शिक्षणमंत्री यांनी जाहीर केले आहे की 15/10/2022 रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पुढील टप्पा अनुदान देण्याची घोषणा करतील तसेच आगामी अधिवेशनात आर्थिक तरतूद देखील होईल असे स्पष्ट सांगितले आहे. सर्व शिक्षक बांधवांना न्याय मिळावा व 100% प्रचलित अनुदानचा जी आर निर्गमित करून आश्वस्त करावे ही समन्वय संघाची स्पष्ट भूमिका असून तरी 15 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री यांच्या बैठकीत प्रचलित अनुदान मिळण्यासाठी आपल्या परीने राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून आमचा प्रश्न मार्गी लावावा अशी विनंती निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी प्रदीप चौधरी, धनराज महाजन, किशोर पाटील, दीपक पाटील, भाऊसाहेब पाटील, माळी सर, सूर्यवंशी मॅडम, संगीता मॅडम, रुपाली मॅडम, राहुल पाटील, विविध शाळांचे शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.