आरोपीवर जबरी चोरीसह अन्य गुन्हे आहेत दाखल…
अमळनेर:- शहरातील बंगाली फाईल भागातील राहणारा कुविख्यात गुन्हेगार रामजाने उर्फ राहुल पंढरीनाथ पाटील यास अमळनेर पोलिसांनी काल शिताफीने अटक केली आहे.
शहरातील बंगाली फाईल भागात राहणाऱ्या आरोपीवर या पुर्वी नंदुरबार जिआरपी (अमळनेर लोहमार्ग दुरक्षेत्र) येथे जबरी चोरी, लुटमारी, सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला, खंडणी तसेच जिवानिशी ठार मारणे असे गुन्हे दाखल असुन तो सराईत गुन्हेगार आहे. तसेच तो चाकु सुरे ताब्यात बाळगुन रेल्वेतील प्रवास करणारे तृतीय पंथीवर दहशत निर्माण करुन त्याच्याकडुन जबरदस्तीने प्रत्येकी एक हजार रुपयाची हप्ता वसुली करत अजून प्लेटफार्मवरील प्रवाश्याकडुन जबरीने पैसे हिसकावून घेत असे. दिनांक २० डिसेंबर रोजी रात्री अमळनेर रेल्वे प्लेटफार्म वरती सचिन पाटील (वय २२ रा. शिवशक्ती चौक) यास त्याने चाकुने मारुन मोबाईल हिसकावुन नेला होता. या बाबत नंदुरबार रेल्वे पोलीस स्टेशनला जिवे ठार मारण्याचा व जबरी चोरीचा गुन्हा नोंद होता. सदर गुन्हयात तो फरार होता. दिनांक २९ रोजी पो. नि. विजय शिंदे यांना मिळालेल्या गोपणीय बातमी नुसार शहरात गांधलीपुरा भागातील मामाजी व्यायाम शाळा जवळ राहुल उर्फ रामजाने पंढरीनाथ पाटील हा मोठा चाकु हातात घेवुन दहशत माजवित असताना मिळुन आल्याने त्यास पोनि विजय शिंदे व पोलीस अमंलदार यांनी मोठ्या शिताफीने पकडले असुन त्याच्या विरुध्द पोकाँ निलेश मोरे यांनी फिर्याद दिल्यावरुन भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 सह म.पो. का. क. 135 अन्वये गुन्हा दाखल झाला असुन रामजाने पाटील यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे. नमुद गुन्हयाचा तपास पोहेकॉ कपिलदेव पाटील हे करत आहेत. या कारवाईवेळी पथकात पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पोउपनि अनिल भुसारे, पोहेकॉ सुनिल हटकर, पोहेकॉ किशोर पाटील, पोना रविंद्र अभिमन पाटील, पोना शरद पाटील, पोना दिपक माळी यांचा समावेश होता.