
अमळनेर:- तालुक्यातील युवा उद्योजक व टाकरखेडा येथील जिजाऊ आयटीआयचे संचालक प्रथमेश मधुकर पवार (पाटील) यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाचे सचिव संजय मोरे यांनी अमळनेर तालुकाप्रमुख पदी नियुक्ती केल्याचे नियुक्तीपत्र देऊन अभिनंदन केले आहे.

नियुक्तीपत्रात म्हटले आहे की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्ववाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवणीचा सक्रियपणे प्रचार व प्रसार करून बाळासाहेबांची शिवसेना पक्ष वाढीसाठी शिवसेनेचे मुख्यनेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा अमळनेर तालुकाप्रमुख पदी नियुक्ती केल्याचे एकनाथ शिंदे यांचे पक्षीय मुख्यसचिव संजय भाऊराव मोरे यांनी नियुक्तीपत्रातून कळविले आहे.

महिला आघाडीच्या भाजपा माजी नेत्या सुरेखा पवार यांचे सुपुत्र असलेले प्रथमेश मधुकर पवार यांना घरातूनच राजकिय व सामाजिक वारसा लाभल्याने बाळासाहेबांची शिवसेना अमळनेर तालुकाप्रमुख पदी निवडीबद्दल जिल्ह्याचे नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार चिमणराव पाटील, जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, जिल्हा पदाधिकारी वासुदेव पाटील, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय कार्याध्यक्ष पत्रकार वसंतराव पाटील, विजय पाटील, गौरवकुमार पाटील, माजी नगरसेवक संजय कौतिक पाटील, माजी सभापती दिपक पाटील, माजी नगराध्यक्ष प्रभाकर पाटील आदींसह शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.










