एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड, समर्थकांनी केला जल्लोष…
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भिकन भालेराव पाटील यांची काल बिनविरोध निवड पार पडली. यावेळी समर्थक व ग्रामस्थांनी जल्लोष केला.
काल ४ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता मारवड येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात या निवडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भिकनराव पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. यावेळी निवडणूक निरीक्षक म्हणून पंचायत समितीतील कृषी अधिकारी एस. व्हि. सोनवणे यांनी काम पाहिले.
नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच आशा सुभाष भिल, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्या उज्वला शरद पाटील, कविता गजानन चौधरी, शीतल अशोक पाटील, रजनी राकेश गुरव, सचिन अशोक पाटील, सुरेश बाविस्कर, जगदीश राजेंद्र भिल उपस्थित होते. यावेळी दिलीप शामराव पाटील, जयवंतराव पाटील, रावसाहेब पाटील, उमेश साळुंखे, गोकुळ साळुंखे, रवींद्र यादवराव पाटील, उमेश सुर्वे, महेंद्र वसंत साळुंखे, ज्ञानेश्वर शांताराम साळुंखे, हरिभाऊ मारवडकर, वासुदेव मारवडकर, चंद्रकांत हिंमतराव साळुंखे, पंकज साळुंखे, जितेंद्र पांडुरंग पाटील, अशोक चौधरी, घनशाम साळुंखे, दिलीप दिनकर साळुंखे, महेश भटू पाटील, दिलीप राजाराम चव्हाण, राजेन्द्र साळुंखे, शरद साळुंखे, हेमकांत साळुंखे, सचिन साळुंखे, शरद कुंभार, युवराज धनगर, रवींद्र साळुंखे, सदाशिव साळुंखे, यांच्यासह मोठ्या प्रमाणावर समर्थक व ग्रामस्थ उपस्थित होते.
उपसरपंचपदी निवडीने शांत सोज्वळ नेतृत्वाचा उदय…
श्री. भिकन भालेराव पाटील यांची उपसरपंचपदी निवड झाल्याने सुस्वभावी नेतृत्वाची दमदार सुरुवात झाली आहे. कठीण परिस्थितीला तोंड देवून कर्तुत्व निर्माण करणाऱ्या भिकनराव पाटील यांनी बाहेरगावी राहत कष्टमय परिस्थितीशी संघर्ष करत आपल्या स्वभाव व कार्याच्या माध्यमातून अनेक हितसंबंध निर्माण केले. आपल्या गावाशी असलेली नाळ न तुटू देता मातृभूमीची सेवा करण्याच्या उद्देशाने गावात स्वतःची शैक्षणिक संस्था उभी करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे द्वार खुले केले. मनमिळावू स्वभाव व सर्वांचे म्हणणे ऐकून घेण्याच्या सवयीने त्यांनी मोठ्या प्रमाणावर गोतावळा जमविला आहे. यंदा ग्रामपंचायत निवडणुकीत उभे ठाकत पॅनलला यश मिळवून देत स्वतः उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याने मागील अपयश धुवून काढत दमदार सुरुवात केली आहे. या सुस्वभावी नेतृत्वाचा विजय झाल्याने गावाच्या सर्वागीण विकासाचा विश्वास समर्थकांनी व्यक्त केला आहे.
मतदार व सर्व ग्रामस्थांचे मानले आभार…
ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये आधी सदस्य व नंतर उपसरपंच म्हणून बिनविरोध निवडून दिल्याबद्दल ग्रामस्थांचे ऋण व्यक्त करत ठेवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही दिली असून मारवड गावाच्या विकासासाठी कुठल्याही प्रकारची कटुता न ठेवता फक्त गावचा विकास कसा होईल हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून कामाला सुरुवात करणार असल्याचे भिकनराव पाटील यांनी सांगितले.