गुन्हा दाखल करत अमळनेर पोलिसांची कडक कारवाई…
अमळनेर:- कॉलेजवरून परतणाऱ्या मुलीची छेड काढत विनयभंग करणाऱ्या चौघांना अमळनेर पोलिसांनी ताब्यात घेत विविध कलमाखाली गुन्हे दाखल केले आहेत.
शहरातील एका काॅलेजची मुलगी काॅलेजवरुन परत घरी जात असतांना चार टवाळखोर मुलांनी तीची छेड काढली. त्यापैकी अनिरुद्ध चांडाले याने तिला अश्लील आवाज देवून तिच्याकडे येवून तीला स्पर्श करुन तीचा विनयभंग केला. उर्वरित त्याचे टवाळखोर जोडीदार चंद्रकांत पाटील, अविनाश चंडाले, बाळा उर्फ पंकज हे मुलीला अश्लील बोलून अनिरुद्ध यास तिला धर म्हणत प्रोत्साहन देवू लागले. त्यावेळी तीला घेण्यासाठी आलेले तिचे पती यांनी अनिरुद्धला तिच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला असता तीच्या पतीस मारहाण केली. सदर घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना मिळताच त्यांनी या आरोपींना लागलीच शोधून आणण्यास पथक पाठविले. तसेच चौघांविरुद्ध विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल करून घेतला. मुख्य आरोपी अनिरुद्ध सह तीन जणांना पोलीसांनी शोधून पकडले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. गंभीर गुन्हा दाखल करुन कडक कारवाई करण्यात येवून तक्रारदार मुलीवर दबाव आणून प्रकरण दाखल होवू न देण्याची बाब अमळनेर पोलीसांनी यशस्वी होवू दिली नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी अशा प्रकारच्या घटना अमळनेर शहर व परिसरात खपवून घेतल्या जाणार नाहीत असा संदेश दिला असून यापुढे कोणीही गैरप्रकार करण्यास धजावणार नाही अशी कडक कारवाई केली आहे. या संपूर्ण कारवाई मध्ये पोउनि विकास शिरोळे, सफौ. संजय पाटील, पोह किशोर पाटील, पोना शरद पाटील, दिपक माळी, रवि पाटील, सिद्धांत सिसोदे, नम्रता जरे व चालक सुनिल पाटील यांचे सहकार्य लाभले.