अमळनेर:- तालुक्यातील नांद्री येथे “चांग्या-पाच्या” देवाचा यात्रोत्सव आज दि. २६ मार्च रोजी चैत्र शुद्ध लक्ष्मी पंचमी रविवार रोजी भरणार आहे.
नांद्री गावापासून थोड्या अंतरावर पातोंडा-दहिवद शिव रस्त्यावर गेल्या तीनशे वर्षा पूर्वीचे पुरातन “चांग्या-पाच्या” देवाचे जागृत देवस्थान आहे. सदरचे चांग्या-पाच्या देव मोठ्या लाकडी अशा देव्हारारुपी मंदिरात विराजमान आहेत. सदरचे देव नांद्री गावावरून जात असतांना त्यांनी देवस्थान जागेवर रात्री मुक्काम केला होता. अशी आख्यायिका भगत भक्त व ग्रामस्थ सांगतात.
या जागृत देवस्थाचा यात्रारूपी उजाळा मिळावा व भगत भक्तांच्या या देवस्थानाला मान मिळावा या साठी भगत भक्तांनी व भाविक ग्रामस्थानी देवाला यात्रोत्सवाचा मान दिला. २०१९ पासून हा यात्रोत्सव भरत आहे. अशी माहिती भगत भक्त संजीव महाराज मुकटीकर व वासुदेव मराठे आदी भक्तांनी दिली. यात्रोउत्सवाच्या दिवशी नांद्री गावात चांग्या-पाच्या देवाची ४५ फूट काठीची मिरवणूक काढून नगर प्रदक्षिणा चे आयोजन ग्रामस्थ करत असतात. व भंडारा कार्यक्रमाचे आयोजन संध्याकाळी करण्यात आले आहे. या यात्रोउत्सवाला बहुसंख्य भगत भक्तांची उपस्थिती लाभणार असल्याचे कळते. तरी सर्व भाविक, भगत भक्तांसह व ग्रामस्थांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आयोजकांनी कळविले आहे.