अमळनेर:- तालुक्यातील मारवड विविध कार्यकारी सोसायटीत तज्ञ संचालकांची निवड दिनांक २६ रोजी मासिक सभेत करण्यात आली.
दि. २६ मार्च रोजी सकाळी १० वाजता मारवड वि. का. स. सोसायटीची मासिक मिटींग राकेश गोविंदराव मुंदडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सदर सभेत लोटन फकिरा पाटील(एल. एफ.नाना) व सुनिल पाटील यांची सोसायटीच्या ” तंज्ञ संचालक” पदी निवड करण्यात आली. यावेळी सोसायटीचे सर्व संचालक मंडळ तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. लोटन फकिरा पाटील यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.