डॉ. तुषार पाटील यांनी मोफत तपासणी करत केले मार्गदर्शन…
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथे मोफत हृदयरोग चिकीत्सा व मार्गदर्शन आरोग्य शिबिर काल २६ रोजी पार पडले. यावेळी परिसरातील नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.
सर्वज्ञ कार्डिओ केअर सेंटर, धुळे येथील हृदयरोग तज्ञ डॉ. तुषार पाटील यांचे वतीने आरोग्य शिबिरात मोफत चाचण्या करत मार्गदर्शन करण्यात आले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी माजी जि.प. सदस्य शांताराम पाटील, किसान काँग्रेसचे सुरेश पिरण पाटील, जयवंतराव पाटील, सरपंच आशाबाई भील, उपसरपंच भिकन भालेराव पाटील, उमाकांत साळुंखे, गोकुळ साळुंखे, डॉ. घनशाम पाटील यांच्या सह मान्यवर उपस्थित होते. कै. बी आर पाटील ज्युनियर कॉलेज येथे या शिबिराचे आयोजन मारवड ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले होते. यावेळी बीपी, ईसीजी, लिपिड प्रोफाइल, ब्लड शुगर, सेंट्रल अवोटिक प्रेशर आदी चाचण्या करण्यात आल्या. व मोफत गोळ्या औषधी देण्यात आल्या. या शिबिरासाठी डॉ. घनशाम पाटील, डॉ. आनंद मुंदडा, डॉ. नितीन मराठे, डॉ. चेतन मुंदडा, डॉ. सुरेश साठे, निलेश माळी, डॉ. प्रवीण महाजन, डॉ. कैलास पाटील, भूषण पाटील, लक्ष्मीकांत पाटील, धनश्री देशमुख, सोना सकट, रोशन पाटील, पंकज सूर्यवंशी, किशोर सूर्यवंशी यांच्यासह टीमचे सहकार्य लाभले.