सात्री ग्रामस्थांच्या मागणीनुसार मंजूर रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी…
अमळनेर:- येथील पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या वतीने सात्री ग्रामस्थांच्या मागणीनुसार मंजूर रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे समिती सात्री ग्रामस्थाच्या पाठीशी असल्याचे जनआंदोलन समितीच्यावतीने तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना प्रत्यक्ष दिलेल्या निवेदनाप्रसंगी कळविले आहे. प्रशासन सात्री ग्रामस्थांच्या मागणीवर सकारात्मक असून लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे यावेळी तहसीलदार यांनी समितीच्या सदस्यांना आश्वासन दिले.
सात्री ग्रामस्थांच्या वतीने सातत्याने विविध मागण्यासाठी आंदोलन होत होती या सर्व आंदोलनांच्या पाठीशी पाडळसे धरण जनांदोलन समितीने धरणातील प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ म्हणून उभे राहण्याची भूमिका घेतलेली आहे या पार्श्वभूमीवर महेंद्र बोरसे यांनी ग्रामस्थांच्या रस्त्याच्या मागणीचा पाठपुरावा सुरू ठेवलेला असताना धरण समितीने देखील वेळोवेळी या पाठपुराव्याला समितीच्या पाठिंब्याची जोड दिलेली होती पावसाळा डोक्यावर येऊन ठेपला तरी प्रशासनाने दिलेले आश्वासन न पाळल्याने आज पाडळसे धरण जन आंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी हेमंत भांडारकर महेश पाटील सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे आदींनी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांची भेट घेत लेखी पत्र देऊन सदर प्रश्न तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली यावेळी झालेल्या चर्चेत प्रशासन सकारात्मक पद्धतीने लवकरात लवकर कार्यवाही करीत असले बाबत तहसीलदार यांनी समिती सदस्यांना सांगितले.सुनिल पाटील, प्रताप साळी आदिनीही यावेळी उपस्थिती लावली.