अमळनेर:- येथील तहसील आवारात लावलेल्या ट्रॅक्टर चोरुन नेणाऱ्या आरोपीस अमळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दिनांक २८ रोजी रात्री दीड ते चार वाजेदरम्यान अज्ञात आरोपीने तहसील आवारात गौण खनिज चोरी प्रकरणात जमा केलेले ट्रॅक्टर ट्रॉली चोरुन नेले होते. सीसीटिव्ही कॅमेऱ्यात अस्पष्ट फुटेज आले होते. याप्रकरणी पो. नि. विजय शिंदे यांनी सफौ रामकृष्ण कुमावत, पो.ना. मिलिंद भामरे यांना सूचना देत रवाना केले होते. त्यांनी ट्रॅक्टर मालक प्रवीण जगन्नाथ पारधी यास विश्वासात घेत विचारपूस केली असता त्यानेच ट्रॅक्टर चोरुन नेल्याचे कबुली दिली. त्यास न्यायालयात हजर केले असता त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सदरची कामगिरी पो. नि. विजय शिंदे यांच्या सूचनेप्रमाणे सफौ रामकृष्ण कुमावत, पो.ना. मिलिंद भामरे यांनी बजावली आहे.