आमदार अनिल पाटील यांनी केली पाडळसे प्रकल्पाच्या कामाची पाहणी…
अमळनेर:- गेल्या कित्येक वर्षापासून धरणाचे काम तांत्रिक, आर्थिक अडचणी तसेच राजकारणामुळे रखडले होते. यासाठी आपण पाठपुरावा करून तांत्रिक अडचणी दूर केल्या आहेत. टप्प्या- टप्प्याने काम पुढे सरकत आहे. हे काम आपण बंद पडू देणार नाहीत. येत्या दीड वर्षात प्रस्तंभांची उंची वाढून पाडळसे धरणात अथांग महासागर आपल्याला पहावयास मिळेल, असा निर्धार आमदार अनिल पाटील यांनी यांनी प्रकल्पस्थळी भेट दिल्या प्रसंगी व्यक्त केला.
दोन जिल्हे व सहा तालुक्यांना वरदान ठरणार्या निम्म तापी पाडळसे प्रकल्पाच्या कामाच्या पाहणी निमित्त आमदार धरणावर पोहोचले होते.यावेळी बोलताना आमदार पाटील पुढे म्हणाले, की गेल्या काही वर्षांपासून पाडळसे धरणाच्या कामासाठी अनेक तांत्रिक अडचणी होत्या. त्यामुळे निधी मिळत नसल्याने काम इंच भरही पुढे सरकले नव्हते. यासाठी आपण गेल्या साडेतीन वर्षात शासनदरबारी पाठपुरावा केला. धरणासाठी निधीही उपलब्ध करून दिला आहे. येता पावसाळा सुरू होण्यापूर्वी 12 हजार क्युबीक काँक्रिटीकरणाचे कामाचे नियोजन आहे. पैकी आजतागायत 7 हजार क्युबिक काँक्रिटीकरणाचे कामही पूर्ण झाले आहे. येत्या 10 जूनपर्यंत उर्वरीत काम पूर्ण होईल. धरणाची तळापासून वरपर्यंत 165 मीटर उंची आपल्याला अपेक्षित होती ती येत्या एक ते दीड वर्षांत आपल्याला गाठता येऊ शकेल. त्यानंतर जसजसं प्रस्तंभांची उंचीही वाढत राहील. त्यानंतर 165 मीटरची उंची पूर्ण झाल्यानंतर गेट बसविण्याचीही आपल्याला परवानगी मिळेल. हे गेट ज्या दिवशी बसविले जाईल तो दिवस खर्या अर्थाने माझ्यासाठी व आपल्या मतदारसंघातील जनतेसाठी भाग्याचा असेल, असे असेही आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, विधानसभा क्षेत्रप्रमुख भागवत पाटील, ज्येष्ठ नेते एल.टी.पाटील, कार्याध्यक्ष प्रा.सुरेश पाटील, बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक अशोक आधार पाटील, समाधान धनगर, भाईदास भिल, भोजमल पाटील, विजय शेखनाथ पाटील, उमाकांत साळुंखे, उपसरपंच कळमसरे जितेंद्र राजपूत, अंबारे ग्रा.पं.सदस्य गजेंद्र पाटील, करणखेडा सरपंच महेंद्र पाटील, नगरसेवक विवेक पाटील, दीपक पाटील, बाम्हणे विकास संस्थेचे चेअरमन गणेश भामरे, जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी गौरव नाना पाटील, युवक माजी अध्यक्ष बाळू पाटील, इमरान खाटीक, युवक अध्यक्ष नीलेश देशमुख, शुभम पाटील, भटू पाटील, भय्यासाहेब पाटील, मुन्ना पवार, सनी गायकवाड, राहुल गोत्राळ, भूषण पाटील, नीलेश पाटील यांच्या सह तापी पाटबंधारे विभागाचे अभियंता, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
तापी मातेला केली प्रार्थना..!
आमदार अनिल पाटील यांनी पाडळसे प्रकल्पाच्या भेटीप्रसंगी तापी मातेला वंदन करून प्रार्थना केली ते म्हणाले, की माझ्या जनतेचे हीत हे पाडळसे प्रकल्पाच्या पूर्णत्वातच आहे. आम्ही निवडणुकीच्या पूर्वी पहिलं नारळ तापी मातेलाच अर्पण केले आहे. एक चंग बांधला आपल्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत या धरणाच पूढचं नारळ जर का आपल्याला वाढवायचं असेल, तर हे पिअर्स वर गेल्यानंतर तीथून आपल्याला ते वाहता आला पाहिले असा चंगच आपण बांधला आहे. ती स्वप्नपूर्ती आता होत असताना आता मला मनस्वी आनंद होत आहे, असेही आमदार पाटील म्हणाले.