अमळनेर:- हज यात्रेला जाणाऱ्या ९१ भाविकांना काल अमळनेर येथे मेंदूज्वरची लस देण्यात आली.
अमळनेर येथील मा नगरसेवक हाजी शेखा मिस्तरी, सामाजिक कार्यकर्ते राजु अलाउद्दीन शेख,मा नगरसेवक फिरोज मिस्तरी, सैय्यद मुख्तार अली यांच्या मार्गदर्शनाखाली पवित्र हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी मेंदूज्वर लसीकरण शिबिर शहरातील कसाली मोहल्ला, किल्ला चौक येथील अक्सा हाॅल मध्ये आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात अमळनेर, चोपडा, पारोळा, धरणगांव, शिरपूर येथील एकुण ९१ भाविकांनी लाभ घेतला. हज यात्रेसाठी जाण्यासाठी मेंदूज्वरची लस घेणे बंधनकारक असते हे लस नाही घेतली तर सौदी अरेबिया येथे विमानतळ प्रवेश नाकारण्यात येतो ही लस जिल्हास्तरावर असते परंतु मागील काही वर्षांपासून ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रकाश ताडे यांच्या प्रयत्नाने अमळनेर येथे शिबिर आयोजित करण्यात येत आहे. लसीकरण शिबिरात माजी आमदार साहेबराव पाटील, जि प सदस्य जयश्री पाटील यांनी भेट दिली. डॉ प्रकाश ताडे, डॉ विलास महाजन यांच्यासह आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अनमोल सहकार्य केले.