अमळनेर:- तालुक्यातील लोण खु. व निंभोरा येथे तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्या तीन टपरी चालकांवर मारवड पोलिसांनी कारवाई केली आहे.
तालुक्यातील लोण खु. येथे गावात अल्पवयीन मुलांना तंबाखू, गुटखा व सिगारेट विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्याने पोकॉ तुषार वाघ, हेकॉ भरत इशी, पोना भरत गायकवाड यांच्या पथकाने छापा टाकला असता मराठी शाळेजवळील महाराष्ट्र पान सेंटरचा चालक मनवर शहा मेहबूब शहा याच्याकडे तंबाखू, बिडी, सिगारेट असा मुद्देमाल आढळून आला तसेच गरीब नवाज पान सेंटरचा चालक शाहरुख रशीद फकीर यांच्याकडेही तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. पोकॉ तुषार वाघ यांच्या फिर्यादीवरून सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम २००३ कलम ६ व २४ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.
तसेच तालुक्यातील निंभोरा येथील जि.प. शाळेसमोर असलेल्या दीपक पान सेंटरवर हेकॉ सुनील अगोने, हेकॉ संजय पाटील, हेकॉ फिरोज बागवान यांनी छापा टाकला असता टपरी चालक दीपक सुभाष पाटील यांच्याकडे तंबाखू, सिगारेट, बीडी आदी मुद्देमाल आढळून आल्याने सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम २००३ कलम ६ व २४ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.