
अमळनेर:- कुस्तीपटूवर अन्याय करणाऱ्या ब्रिजभूषणसिंग व कुस्तीपटुंना खेचाताण करणाऱ्या मोदी सरकारचा तसेच शरद पवारांवर टीका करणाऱ्या सदावर्ते दाम्पत्याचा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध करण्यात आला.
ब्रिजभूषणसिंग याना अटक करण्याऐवजी आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूना ओढून ताणून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या मोदी सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेसने अमळनेर तहसील कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करून निषेध केला. यावेळी जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील, हिंगोणे सरपंच राजश्री पाटील, मंदाकिनी भामरे , योजना पाटील, अलका पवार, आशा चावरीया, कराटे खेळाडू पूर्वशी पाटील, बाजार समिती संचालक भोजमल पाटील, कार्याध्यक्ष प्रा सुरेश पाटील, शहराध्यक्ष मुख्तार खाटीक ,प्रा अशोक पवार, इम्रान खाटीक, विश्वास पाटील, दीपक पाटील, नरेंद्र पाटील आदी हजर होते.







