
काल दुपारी शहरातील बोरी नदीच्या फरशी पुलावर घडली घटना…
अमळनेर:- डंपरने मागून धडक दिल्याने शनी मंदिरावरील पुजाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दिनांक १४ जून रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास बोरी नदीच्या फरशी पुलावर घडली.
शनी मंदिराचे पुजारी मनोज वासुदेव उपासनी (वय ४७) हे आपली मोटरसायकल एमएच ०३ बीजी ०९१२ वर दुपारी दीड वाजेच्या सुमारास फरशी पुलावरून जात असताना मागून येणाऱ्या एमएच ११ एएल ५७८३ या डम्परने धडक दिल्याने उपासनी याची मोटरसायकल डंपरच्या चाकात अडकून तो ५० ते ६० मीटर फरफटत ओढला गेला. आणि पुलावरील फुटपाथ च्या दगडाचा मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. उपासनी याच्या पुतण्याने अमळनेर पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून डंपर चालकविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.







