अमळनेर:- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२३ मध्ये , विद्या प्रसारक मंडळाचे विद्या मंदिर, दहिसर(मुंबई) विद्यालयातील कुमारी हर्षदा पंकज पाटील हिने इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत 84.00 टक्के गुण मिळवित विद्या मंदिर,दहिसर (मुंबई)शाळेतून दोन्ही माध्यमातून प्रथम क्रमांक व मुंबई विभागातून तृतीय क्रमांक पटकावला असून ती शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरली आहे. याबद्दल शाळेचे विश्वस्त मंडळ, मुख्याध्यापक सुधीर देसाई सर यांनी तिचे अभिनंदन केले व सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.