अमळनेर:- 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेरात होत आहे. त्या निमित्ताने मराठी वांड्.मय मंडळ,
अमळनेर तर्फे 20 ऑगस्ट रोजी तालुक्यातील शालेय, विद्यालय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी वक्तृत्व, निबंध व काव्य लेखन, इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
रविवार, दिनांक 20 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10 वाजता मराठी वांड्.मय मंडळाचे नांदेडकर सभागृह या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धा होईल. वक्तृत्व स्पर्धा इ.8वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी होईल. वक्तृत्व स्पर्धेचे विषय- वैभवशाली अमळनेर, अखिल भारतीय साहित्य संमेलनात एक अमळनेरकर म्हणून माझा खारीचा वाटा, माझा आवडता लेखक, मी वाचलेलं पुस्तक, अमृत महोत्सवी स्वातंत्र्य. हे विषय आहेत. वक्तृत्वासाठी 4 मिनिटे वेळ राहील. दुसरी स्पर्धा-निबंध स्पर्धा,सदरील स्पर्धा 5वी ते 8वी व 9वी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राहणार आहे. लहान गट विषय-
मातृदयी साने गुरुजी, श्रावणसरी,आई वडील-गुरु, मोठा गट विषय-बहिणाबाई, माझे खान्देश, नात्यांमधील गुंफण, सदरील निबंध A4 साईज पेपरवर एका बाजूने लिहिलेला व स्वहस्तलिखित असावा. सदरील निबंध-मराठी वांड्.मय मंडळाचे नांदेडकर सभागृह,अमळनेर येथे 12 ऑगस्ट पावेतो जमा करावेत. तिसरी स्पर्धा-काव्य लेखन स्पर्धा सदरील काव्य लेखन स्पर्धा इयत्ता 9 वी ते 12 वी च्या वर्गांसाठी आहे. काव्य लेखन हे स्वरचित असावे व काव्य लेखनाला विषयाचे बंधन नाही. काव्य लेखन हे 12 ऑगस्ट 2023 पावेतो मराठी वांड्.मय मंडळाचे नांदेडकर सभागृह येथे जमा करावेत. स्पर्धेसाठी भैय्यासाहेब मगर, वसुंधरा लांडगे, स्नेहा एकतारे, संदीप घोरपडे, बन्सीलाल भागवत, सुरेश माहेश्वरी, शीला पाटील, पी.बी भराटे यांच्याकडे दिनांक 12 ऑगस्ट 2023 पावेतो नावे नोंदणी करावी. प्रथम विजेत्यास 1000 रुपये, द्वितीय विजेत्यास 700 रुपये, तृतीय विजेत्यास 500 रुपये व सहभागी प्रत्येक विद्यार्थ्यास आकर्षक सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल तसेच रविवार, दिनांक 20 ऑगस्ट रोजी-वक्तृत्व स्पर्धा संपल्यानंतर तिन्ही स्पर्धांचे बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते दिली जातील असे म.वा. मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी, श्यामकांत भदाणे, रमेश पवार, सोमनाथ ब्रह्मे, नरेंद्र निकुंभ, शरद सोनवणे, प्रदीप साळवी, श्याम पवार, अजय केले यांनी कळविले आहे.