शिलाफलकाचे केले अनावरण, मान्यवरांनी केले वृक्षारोपण…
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथे ग्रामपंचायतीच्या वतीने देशात सुरू असलेल्या मेरी मिट्टी मेरा देश या अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहीद विजय साळुंखे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. मारवड येथील गावठाण भागात असलेल्या शहीद स्मारकाच्या बाजूला शिलाफलकाचे अनावरण करण्यात आले. सदर कार्यक्रमास मारवड पोलिस ठाण्याचे एपिआय शितलकुमार नाईक, सरपंच आशाबाई भील, उपसरपंच भिकन भालेराव पाटील, सर्व ग्रा.पं. सदस्य, ज्येष्ठ नागरिक साहेबराव नारायण साळुंखे, ग्रामसेवक सनेर, हेकॉ फिरोज बागवान, पोना सुनील पाटील, हर्षल पाटील, ग्रामसेवक नितीन पाटील हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी शहीद जवान विजय साळुंखे यांचे वडील साहेबराव दौलत साळुंखे यांचा सत्कार एपिआय शितलकुमार नाईक यांच्याहस्ते करण्यात आला. नुकतेच सेवेतून निवृत्त झालेले सैनिक सुनील साळुंखे, तुषार मारवडकर, दिलीप रामचंद्र पाटील व सध्या भारतीय सेनेत कार्यरत असलेला जवान मयूर चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. मान्यवर व ग्रामस्थांनी पंचप्राण शपथ घेतली. ग्रामपंचायत इमारतीच्या आवारात एपीआय नाईक यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी अंगणवाडी सेविका, मदतनीस, जिप शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, पोलीस कर्मचारी, आशा स्वयंसेविका तसेच गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एल जे चौधरी यांनी तर आभार ग्रामसेवक नितीन पाटील यांनी मांडले.