अमळनेर येथे शिवसेनेने तहसील कचेरीवर काढला मोर्चा…
अमळनेर:- जालना येथे मराठा समाजावर झालेल्या लाठीमाराचा निषेध करत शिवसेनेने देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
अमळनेर तालुका शिवसेनेने तहसील कचेरीवर मोर्चा काढून तहसीलदार रुपेशकुमार सुराणा याना निवेदन दिले. त्यात त्यांनी मराठा समाजावर झालेल्या अमानुष लाठीमाराची जबाबदारी गृह विभागाची आहे.ही जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा तसेच तालुक्यातील सर्व मंडळातील शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे. परंतु ई पीक पाहणी ऑनलाइन प्रणाली होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील सर्व शेतकरी व कष्टकरी लोकांना ७/१२ उताऱ्यावर तलाठी मार्फत पीक पाहणी लावण्यात यावी असे आदेश देण्यात यावेत असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर उपजिल्हा प्रमुख कल्याण पाटील, तालुका प्रमुख श्रीकांत पाटील, माजी तालुका प्रमुख विजय पाटील, शहर प्रमुख सूरज परदेशी, महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख मनीषा परब, माजी नगरसेवक प्रताप शिंपी, शहर प्रमुख उज्वला कदम, तालुका उपप्रमुख बाळासाहेब पाटील, राजेंद्र मराठे, नंदू भिल, प्रमोद शिंपी, मगन शिंगाणे, ज्ञानेश्वर पाटील, विमल बाफना, सतीश पाटील,सुनीता माने, शुभांगी राणे,प्रकाश पाटील, विलास पवार यांच्या सह्या आहेत.