प्रताप महाविद्यालयात विद्यापीठस्तरीय कार्यशाळा झाली संपन्न…
अमळनेर:- येथील प्रताप महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ४ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता प्रताप महाविद्यालयात “मेरी मिट्टी मेरा देश” कार्यक्रमांतर्गत अमृत कलश संकलन नियोजन व राष्ट्रीय सेवा योजना एकक कार्यक्रम अधिकारी, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, महिला कार्यक्रम अधिकारी यांची विद्यापीठस्तरीय कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यशाळेप्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय सेवा योजना सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे, जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेष पाटील, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे व्यवस्थापन सदस्य तथा या उपक्रमाचे महाराष्ट्र राज्याचे समन्वयक राजेंद्र नन्नवरे, नेहरू युवा केंद्र संघटन महाराष्ट्र व गोव्याचे राज्य संचालक प्रकाशकुमार मनुरे, प्राचार्य डॉ. संजय चाकणे (पुणे), जळगाव विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. संतोष चव्हाण, कबचौउमविचे रासेयो संचालक डॉ. सचिन नांद्रे, प्राचार्य नरेंद्र पाठक (पुणे), राजेंद्र भामरे (पुणे), अधिसभा सदस्य अमोल सोनवणे, सुनील निकम, नितीन ठाकूर, पदवीधर अधिसभेचे सदस्य अमोल मराठे आदी मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्वलन व कलश पूजन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अमोल पाटील या विद्यार्थ्याने उपस्थितांना पंचप्रण शपथ दिली व राष्ट्रीय सेवा योजनेच्या लक्ष्य गीताने कार्यशाळेची सुरुवात झाली. याप्रसंगी डॉ. सचिन नांद्रे यांनी प्रास्ताविकातून म्हटले की, “प्रत्येक भारतीयांनी आपल्या माती विषयीचा जिव्हाळा आणि अभिमान बाळगला पाहिजे. प्रत्येक नागरिकांनी मूठभर मातीचा सेल्फी काढून या उपक्रमाला प्रवाहित ठेवले पाहिजे. स्वातंत्र्य सैनिकांचा गौरवशाली इतिहासही नव्या पिढीने समजून घेणे गरजेचे आहे. असे मत मांडले. महाराष्ट्र राज्य रासेयो सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे हे प्रमुख अतिथी म्हणून मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, “मेरी मिट्टी मेरा देश” या कार्यक्रम अंतर्गत देशभर राष्ट्रप्रेमाचा, राष्ट्रभक्तीचा जागर होतो आहे. प्रत्येकाला देशाभिमान असला पाहिजे, पराक्रमी हुतात्मा शिरीषकुमार यांच्या आठवणी तरुणांना प्रेरणादायी ठरतात. वीरांना नमन करून मातृभूमीला वंदन केले पाहिजे. आपल्या मातृभूमीचे आपण सर्वांनी स्मरण करायला हवे. भारत हा तरुणांचा देश आहे. भारत हा मातीचा गौरव करणारा एकमेव देश आहे. म्हणून मातीविषयी, राष्ट्राविषयी कृतज्ञता जपली पाहिजे. हे कार्य प्रत्येकाने राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आपण करूया, असे प्रतिपादन केले. खासदार उन्मेष पाटील यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, “प्रत्येक भारतीय नागरिकांनी अमृतकलशाचा सन्मान करून ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या उपक्रमाचे स्वागत केले पाहिजे. त्याचा जागर केला पाहिजे, आज या अभियानाला जसा प्रतिसाद मिळाला तसाच इतरत्रही मिळावा. राष्ट्र विकसित करण्यासाठी अशा जागराची, राष्ट्रभक्तीच्या प्रेरणेची गरज असते. अशा कार्यशाळेचे आयोजन प्रताप महाविद्यालयाने केले, ही प्रेरणादायी गोष्ट आहे. प्रताप महाविद्यालय अशा विविध उपक्रमांना नेहमीच अग्रक्रमाने स्थान देत असते. ही अभिमानाची बाब आहे.” असे मत व्यक्त केले.
तसेच यावेळी डॉ. संजय चाकणे, प्रकाशकुमार मनुरे यांनीही प्रस्तुत कार्यशाळेत मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे यांनी म्हटले की, “अमळनेर हे खानदेशातील स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र होते. या भूमीने अनेक स्वातंत्र्य सैनिक निर्माण केलेत. त्यांचे कार्य अजरामर झाले आहे. अशा सैनिकांमुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले म्हणून अशा शूरवीरांच्या आठवणींना आणि कार्याला उजाळा दिला पाहिजे. ही कार्यशाळा त्याचेच द्योतक आहे.” असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी खानदेश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र झाबक, उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख, उपाध्यक्षा माधुरी पाटील, विश्वस्त वसुंधरा लांडगे, कार्याध्यक्ष डॉ. अनिल शिंदे, कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल, संचालक हरी भिका वाणी, योगेश मुंदडे, सी.ए. नीरज अग्रवाल, चिटणीस तथा प्राचार्य डॉ. ए.बी.जैन, सहचिटणीस डॉ. धीरज वैष्णव, महाविद्यालयीन प्रतिनिधी प्रा. आर. एम. पारधी आदी उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ. जी.एच.निकुंभ, प्रा डॉ. कल्पना पाटील, प्रा. डॉ. जयंत पटवर्धन, प्रा. पराग पाटील, प्रा. डॉ. विजय मांटे, प्रा. यु.जी. मोरे, सिनेट सदस्य डॉ. संदीप नेरकर, उपस्थित होते. कार्यालयीन अधीक्षक राकेश निळे, कुलसचिव आबासाहेब मराळे, तसेच कबचौ उमवि जळगाव परिक्षेत्रातील विविध महाविद्यालयातील रासेयोचे कार्यक्रमाधिकारी, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, रासेयोचे स्वयंसेवक, विद्यार्थी व विविध शाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. हेमंत पवार, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. सुनील राजपूत, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. भाग्यश्री जाधव यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. योगेश तोरवणे यांनी केले तर आभार डॉ. हेमंत पवार यांनी मानले.