![](https://i0.wp.com/amalner24news.in/wp-content/uploads/2023/09/379fe3c994c8d4f7e6afc811703e662d1665828651217580_original.jpg?fit=720%2C540&ssl=1)
अमळनेर कोर्टात सुनावली एकाला सहा वर्षाची शिक्षा…
अमळनेर :- मागील भांडणाचा राग डोक्यात ठेवून ज्वलनशील पदार्थाने घराला आग लावणाऱ्या एकाला अमळनेर न्यायालयाने सहा वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
![](https://i0.wp.com/amalner24news.in/wp-content/uploads/2023/09/IMG-20230904-WA0060-29.jpg?resize=640%2C427&ssl=1)
आरोपी देवेंद्र पांडुरंग पाटील (वय २४ रा.मोरया नगर चाळीसगाव) याने फिर्यादी युवराज आधार पाटील (रा.पाटील गढी चोपडा) यांच्या घरी पूर्वी झालेल्या बहीण पाहुण्यांचा वाद पोलीस स्थानकात मिटल्यावर देखील तो राग डोक्यात ठेवून आरोपीने फिर्यादी व त्याचा मुलगा यास तुझ्या पोरांना समजावून सांगा, अशी धमकी देऊन मुलगा कॉलर पकडुन लाथांनी मारहाण केली व तुला पुण्याला बघतो, तुझी नोकरी संपवतो.तुझ्या घरच्यांना पण बघतो,तुम्ही येथे कसे राहतात, तुमचे घर जाळून टाकेल, तुमची राख केल्याशिवाय राहणार नाही अशी धमकी देऊन बहीण व भाचीला घेऊन चाळीसगाव निघून गेला.दि.२४ नोव्हेंबर २०२१ रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास फिर्यादी घरात झोपलेले असतांना घराच्या पहिल्या गॅलरी मधून घरात प्रवेश केला.घरातील लाकडी दरवाजा, पडदे,गॅस सिलेंडर वर डिझेल सारखे ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावली.त्यात घर जळाल्याने घराचे नुकसान झाले.भादवी कलम 436,448,427,432 नुसार चोपडा शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर खटल्यात ९ साक्षीदार तपासण्यात आले.त्यात फिर्यादी,प्रत्यक्ष दर्शी साक्षीदार, सरकारी पंच, नोडल अधिकारी, आरोपीचे लोकेशन शोधणारे अधिकारी,व शेजारील रहिवासी, तपासी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक संतोष चव्हाण यांची साक्ष महत्वाची ठरवत जिल्हा न्यायाधीश पी आर चौधरी यांनी आरोपीस सहा वर्षे कारावास व ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवस कारावास, भादवी कलम ४४८ मध्ये २ महिने शिक्षा व १०० रुपये दंड, दंड न भरल्यास ७ दिवस शिक्षा,भादवी कलम ४२७ मध्ये १ महिने कारावास व भादवी कलम ४३२ मध्ये ३ महिने शिक्षा व १०० रुपये दंड,दंड न भरल्यास सात दिवस शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील किशोर बागुल यांनी युक्तिवाद केला.तर पैरवी अधिकारी सहायक फौजदार उदयसिंह साळुंखे, पोलीस हेड कॉन्स्टेबल हिरालाल पाटील,पोलीस कॉन्स्टेबल नितीन कापडणे,अतुल पाटील, राहुल रणधीर यांनी काम पाहिले.