
शिवसेना ठाकरे गटाचे शहर उपप्रमुख अनंत निकम यांनी दंड करण्याची केली मागणी…
अमळनेर:- येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती यांनी भारतीय राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ स्टिकरचा गैर प्रकार केल्याप्रकरणी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होण्याची मागणी केल्याची तक्रार उद्धव ठाकरे शिवसेनेचे शहर उपप्रमुख अनंत निकम यांनी केली आहे.

अनंत निकम यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, प्रांताधिकारी, परिवहन अधिकारी आणि पोलिस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, अमळनेर कृ.उ.बा.समिती सभापती अशोक आधार पाटील यांचे एमएच -१९ सीयू -५०६० क्रमांकाचे वाहनावर मागील व पुढील बाजुस अशोक स्तंभाचे स्टिकर लावले आहे. हि बाब भारतीय राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ यांचा अपमान करणारी आहे. असे स्टिकर लावणे हे बेकायदेशीर आहे. त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.




