
शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर रायबा बहुउद्देशीय संस्थेमार्फत गौरव…
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील कै. न्हानाभाऊ म. तु. पाटील कला महाविद्यालयातील संरक्षणशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. जितेंद्र आनंदा माळी व ग्रंथपाल प्रा. विजय पाटील यांना नुकताच धुळे येथील रायबा बहुउद्देशीय संस्थेमार्फत “राज्य स्तरीय आदर्श शिक्षक रत्न” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

सदर पुरस्कार शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर दि. 3 सप्टेंबर रोजी देण्यात आला. यावेळी धुळ्याचे मा. आमदार प्रा. शरद पाटील, गोरख देवरे, रविकिरण पाटकरी, संचालक प्रकाश अकॅडमी, धुळे. माजी शिक्षणाधिकारी गेंदिलाल साळुंखे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ॲड. राकेश पाटील, सचिव प्रा. प्रमोद पाटील, प्रिया पाटील, प्रा. डाॅ. उमेश गांगुर्डे, प्रफुल्ल पाटील आदी उपस्थित होते. डॉ. माळी व प्रा. पाटील यांचे सर्व पदाधिकारी संचालक मंडळ, तसेच कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.




