
सुंदरपट्टी जि. प. शाळा व ग्रामपंचायतीत पार पडला कार्यक्रम…
अमळनेर:- तालुक्यातील आदर्शगाव सुंदरपटटी येथील ग्रामपंचायत कार्यालयात व जिल्हा परिषद शाळेत नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावाचे प्रथम लोकनियुक्त सरपंच सुरेश अर्जुन पाटील हे होते. अध्यक्षांच्या हस्ते दोन्ही महान विभूतींच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी अमळनेर तालुक्यातील माहिती अधिकार तज्ञ सुनिल अहिरराव सर, शा.व्य स अध्यक्ष दत्तात्रय पाटील, ग्रा.प. ज्येष्ठ सदस्य देविदास पाटील, निळकंठ पाटील, माजी सरपंच रतिलाल पा., भालचंद्र पा., दिपक पाटील मन्साराम पाटील, मोतीलाल पा. ग्रा.प. सदस्या पूनम पाटील गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी शाळेचे मुख्या. संजय जगताप, जयश्री बारड मॅडम, स्मिता सोनवणे मॅडम, विश्वास पाटील सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय जगताप सर यांनी केले. आभार विश्वास पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बारड मॅडम व सोनवणे मॅडम यांनी परिश्रम घेतले.






